Monday, 4 December 2017

अफ़जल ख़ान वध


शिवाजी महाराज प्रतापगडाच्या रणसंग्रामाच्या वेळी अफजलखानास भेटण्यासाठी गेले तेंव्हा शिवाजी महाराजांचे वर्णन करण्यासाठी कवी परमानंद यांनी अनल्पधी: हा शब्द वापरला आहे आणि तो शब्द शिवाजी महाराजांच्या कार्य, कर्तुत्व आणि पराक्रम यासाठी वापरलेल्या मुस्तद्दीपणा, बुद्धीमत्ता यासाठी सूचक असा आहे. शिवाजी महाराज आपल्या शत्रुंशी केवळ हातांनी, शस्त्रांनी लढले असे नाही. ते त्यांच्याशी बुद्धीने लढले.



बुद्धी हेच शरीराच्या आणि शस्त्राच्या लढाईचे अधिष्ठान होते, शिवाजी महाराजांच्या आयुष्यभराचा संघर्ष हा मूलतः बौद्धिक संघर्षच होता आणि तो शरीराच्या आणि शस्त्राच्या माध्यमातून व्यक्त होत होता. बुद्धीच सर्व कर्तुत्वाचे ऊर्जा केंद्र असते आणि तीच सर्व पराक्रमाची जननी असते. शरीर आणि विविध शस्त्र यांना आदेश, दिशा, अचूकता, नियंत्रण व विवेक देण्याचे काम बुद्धीच करत असते आणि शिवाजी महाराजांकडे तर ती "अनल्प" होती. अल्प म्हणजे थोड़ी. अल्प नव्हे ती अनल्प. आज आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रातून इतर गोष्टींबरोबर या अनल्प बुद्धीचा वारसा घेण्याची - बुद्धीने लढण्याचे त्यांचे तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे..

No comments:

Post a Comment

आग्रा भेट - कैद - सुखरूप सुटका

कैद - शिवाजी महाराज हे एकुलते एक योद्धे आहेत ज्यांना आमंत्रण देऊन त्यांना आग्य्रााला बोलावले गेले व सन्मानाऐवजी नंतर कैद फर्माविली...