संपूर्ण दरबार स्तब्ध होऊन महाराजांकडे पाहत होता. सर्व जण शिवाजी महाराजांच्या विभूती व्यक्तिमत्वाचे दर्शन घेत होते. सह्याद्रीचा स्वाभिमान विजेच्या कडेलोटा प्रमाणे औरंगजेबाच्या दरबारामधे हलकल्लोळ करत होता. औरंगजेबासमोर दरबारात मान वर करून बघणे म्हणजे गुन्हाच पण सह्याद्रीचा सिंह औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून गर्जना करीत होता. ही होती अबुल मुज्जफर मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब आणि प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस शिवाजी महाराज यांची पहिली आणि शेवटची भेट. यांनतर हे दोघे कधी एकमेकांना भेटले नाहीत.
कवी भूषणाने लिहून ठेवले आहे -
चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चारिऊ चापि लई दिसिचक्का
भूप दुरीन दुरे भनि भूषन एक अनेकन बारिधि नक्का
औरंगसाहिको साहि के नन्द लर्यो शिवसाहि बजाय कै डंका
सिंह की सिंह चपेट सहै गजराज सहै गजराज का धक्का
मराठी अर्थ – चक्रवर्ती चुगताई घराण्याचा वंशज औरंगजेबाने आपल्या चतुरंगदलाने चारी दिशांना आपला अंमल बसविला. कित्येक राजे दरी खोर्यात लपून बसले. काही समुद्रपार झाले. पण अशा औरंगशाहाविरुद्ध शाहजीनंदन छत्रपति शिवाजी महाराज डंके वाजवून लढले.
सिंहाच्या पंजाचा फटकारा सिंहच सहन करू शकतो आणि हत्तीचा धक्का दुसरा हत्तीच करू शकतो !
महाराजांनी दरबारामधे केलेल्या प्रतिकारास भूषणाचे हे शब्द अगदी तंतोतंत बरोबर ठरतात……

No comments:
Post a Comment